NCP MP Supriya Sule | आधी खाल्ल मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन, शिवसेना नेत्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात कधी कोणावर कोणता आरोप होईल याचा अंदाज नाही. अशातच शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी आधी मटण खाल्ल, मग महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. त्यांनी एक व्हिडिओ आणि स्क्रिन शॉट पोस्ट केले असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवतारे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) या दोन तरुणांशी संवाद साधत आहेत. एका हॉटेलमधला हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही तरुणांनी मटन थाळी (Mutton Plate) ऑर्डर केली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या तरुणांशी संवाद साधताना आपण सुद्धा अशीच थाळी खाली असल्याचे म्हटले आहे.

हाच धागा पकडून शिवतारे यांनी सुप्रिया सुळे मटण खाऊन भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या.
तेथे सोपानकाकांचे दर्शन घेतले असे आरोप केले आहेत.

सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

शिवतारे यांनी केलेल्या आरोपांबाबत सुप्रिया सुळे यांना पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत मला फारशी माहिती नाही. कारण आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
आमचे त्याकडे लक्ष आहे. त्यामुळे मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

Web Title :- NCP MP Supriya Sule | supriya sule eat mutton and took god darshan in temple vijay shivtare share video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Sambhajinagar Accident News | शहरातील काम आटोपून घराकडे निघालेल्या दांपत्याचा अपघात

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

Pune Accident News | मुंबई-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांची अग्निमन दलाकडून सुटका