NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, म्हणाल्या – ‘टाटा एअरबस बाबत मंत्रिमंडळातील…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), बल‌्क ड्रग पार्कनंतर (Bulk Drug Park) आता सी-295 या मालवाहू विमानाची बांधणी करणारा टाटा एअरबस प्रकल्पसुद्धा (Tata Airbus Project) गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे 30 ऑक्टोंबर रोजी बडोदामध्ये उद्घाटन होणार आहे. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडले आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपा (BJP) म्हणत आहे एक वर्षापूर्वीच प्रकल्प गेला. नंतर तुम्ही म्हणत आहात की आम्ही हा प्रकल्प नागपूरलाच करणार आहोत आणि नंतर म्हणत आहात की उपमुख्यमंत्री मन वळवण्यात कमी पडले. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळे बोलत आहे. त्यामुळे मी प्रचंड गोंधळले आहे. मी विरोधक म्हणून विचारत नाही. मी या राज्याची एक नागरिक आहे. या देशाची एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला वाटते हा आपल्या सगळ्यांनाचा अधिकार आहे की नक्की सत्य काय आहे?

 

भाजपच्या मराठी दिवाळी कार्यक्रमाच्या जाहिरातबाजीवर सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, मराठी दिवाळी साजरी करताय, मला दिवाळी असते हे माहिती होते. पण माझी विनम्र विनंती आहे की मराठी दिवाळीचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी जी स्वत:ची जाहिरात केली त्यातून बेस्टला जर पैसे मिळणार असतील तर आनंदच आहे. त्यामुळे जाहिराती नक्कीच करा परंतु लोकालोकांमध्ये एवढे विभाजन कशासाठी?

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, मराठी भाषेवर जर प्रेम असेल तर कृती करून दाखवा.
मराठी वाचनालये आहेत त्यांना मदत करा, मराठी भाषेसाठी काहीतरी वेगळे करा.
तसे न करता केवळ स्वत:च्या जाहिरातबाजीत मराठीपणा नको. आम्ही मराठी लोक फार स्वाभिमानी आहोत.
पण आम्ही भारतीय आहोत याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मराठी असण्याचाही सार्थ अभिमान आहे.

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | supriya sule targets shinde fadnavis government over tata air bus project

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर

Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील