NCP MP Supriya Sule | ‘जर काही झालं तर…’, शरद पवारांना धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना इशारा (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) आल्याचं समोर आलं आहे. ‘तुमचाही लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai CP) भेट घेऊन रितसर तक्रार केली आहे. त्यावंर आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करणार असल्याचे सांगितलंय, असं सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

 

 

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

 

 

मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (NCP MP Supriya Sule) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर (State Government) तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मला व्हॉट्सअॅपवर आज हा मेसेज आला. एका वेबसाईटवरुन अशी धमकी दिली जात आहे. त्या व्यक्तीच्या फॉलोअर्सच्याही काही कमेंट्स आल्या आहेत. हे आक्षेपार्ह आहे. अशा धमक्या आल्या असतील, तर गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवारांना ज्या प्रकारे ही धमकी दिली आहे ते दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

सगळी जबाबदारी सरकारवर

या धमकीवर त्या अकाउंटवर लोकांच्या आलेल्या कमेंट्स पहा. या सगळ्या कमेंट्स कुठून येतात? हे द्वेषाचं राजकारण आहे. यावर महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) कठोर कारवाई करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे. या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आणि गृहमंत्रालयावर आहे. हे असे प्रकार म्हणजे घाणेरडं राजकारण आहे. असे प्रकार थांबायला पाहिजेत. शरद पवारांची सुरक्षा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलंय. बघुयात काय होतंय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Advt.

जर काही झालं तर…

मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय. जर काही झालं,
तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार (Central Government)
आणि राज्य सरकारला दिला आहे.

 

 

Web Title :  NCP MP Supriya Sule | supriya sule warns home minister devendra fadnavis on sharad pawar threatened

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा