मोदी आणि फडणवीस नव्हे तर खा. उदयनराजेंच्या मते ‘हे’ खरे PM आणि CM

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणणारे उदयनराजे भोसले हे आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे उदयनराजे हे अनेकदा पक्षविरोधातही टिपण्णी करतात दिसतात तर कधी एखाद्या चित्रपटाचा डायलॉग मारून कार्यकर्त्यांची माने जिंकतात.

गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती मात्र उदयनराजे यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट विधान केले नव्हेते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद साधला यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाबद्दल भाष्य केलं. त्यानंतर उदयनराजेंनी त्यांना उत्तर दिलं. ‘मला कोणीही खो घालू शकत नाही. नाहीतर मीच खो घालेन,’ असं उदयनराजेंनी म्हटलं. तसंच अडचणीच्या काळात ज्यांनी मला साथ दिली तेच माझ्यासाठी खरे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

भाजप इतर पक्षातील नेत्यांवर ईडीच्या कारवाईची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप होत असताना तुम्हालापण अशी काही ईडीची भीती दाखवली जातेय का ? असा प्रश्न उदयनराजेंना विचारला असता, ‘माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल’ असे उत्तर उदयनराजे यांनी दिले.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी देखील उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांची मन धरणी करण्याचा प्रयत्न केला होता. उदयनराजे कोणत्या पक्षात राहणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागून आहे

आरोग्यविषयक वृत्त –