खा. उदयनराजे यांना आता राजकारणातून ‘अलिप्‍त’ व्हावं वाटतं, जाणून घ्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली असताना आता उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान केले आहे. राजकारणातून अलिप्त व्हावं असे वाटत असल्याचे ते म्हणाले. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आज उदयनराजे यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ही घरगुती भेट असल्याचे सांगतिले.

संभाजी भिडे यांनी उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट झाली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीतून त्याची भेट झाल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संभाजी भिडे आणि समर्थकांचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला डच्चू देऊन उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतात की राष्ट्रवादीत कायम राहतात हे अजून स्पष्ट झाले नाही. परंतू असे झाल्यास राष्ट्रवादीला तो एक मोठा धक्का मानला जाईल. शिवेंद्रराजे यांनी देखील काही दिवसांपू्र्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता उदयनराजेंनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला साताऱ्यात खिंडार पडेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील उदयनराजे यांनी भाजप प्रवेश केल्यास आनंदच होईल असे म्हणले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –