‘त्यांनी’ शिवसेना संपवली, लोकांचे जीवही घेतले ; नवनीत राणांचा हल्लाबोल

नवनीत राणांचा घणाघात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना संपवली आणि काही लोकांचा जीव घेतला अशी घणाघाती टीका अमरावती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केली आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान अमरावती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावेळी शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे या जिल्ह्याचे नाही. या मतदारसंघात त्यांचे नावसुद्धा नाही. त्यांना अमरावतीशी काही घेणे-देणे नाही. त्यांनी जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना संपवली असून केवळ अडसूळ सेना निर्माण केली. असे नवनीत राणा यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्थानिक शिवसैनिकांना घरी बसवले तर काहींचा जीव घेतला.’ असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. नवनीत राणा यांच्या आरोपानंतर जिल्ह्यात फक्त एकच चर्चा रंगली आहे.

You might also like