मी फक्त ‘या’ उमेदवारांच्याच प्रचाराला जातो : सुनील शेट्टी

नवनीत रणांसाठी सुनील शेट्टींचा मेळघाटात रोड शो

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आसल्याने सर्वच पक्षातील उमेदवार सिने कलाकारांना आपल्या प्रचारासाठी आणत आहेत. याचप्रमाणे अमरावती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अभिनेता सुनिल शेट्टी याने मेळघाटातील धारणी येथे रोड शो केला होता.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. विशेष म्हणजे अमरावती लोकसभा मतदार संघाचे येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. याचदरम्यान, उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अभिनेता सुनिल शेट्टी याने मेळघाटातील धारणी येथे रोड शो केला त्यावेळी, ज्या उमेदवाराची विजयी होण्याची मला खात्री असते, जो व्यक्ती लोकांच्या विकासासाठी झटतो त्यांचाच प्रचारासाठी मी जात असतो. त्यामुळे या निवडणुकीत मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी नवनीत राणा यांना खासदार म्हणून निवडणून द्या आणि संसदेत पाठवा. असे अभिनेता सुनील शेट्टी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटातील अनेक प्रश्न सोडवले नाहीत. मात्र यावेळेस आदिवासींचे वीज, पाणी, रस्ते, कुपोषण, पुनर्वसन यांसारखे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नवनीत राणा प्रयत्न करतील. असेही सुनील शेट्टी यांनी म्हंटले. याचबरोबर माझे गेल्या अनेक वर्षांपासून रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी मैत्रीचे नाते आहे. ते कुठल्याही अडचणीच्या काळात, कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी तत्पर असतात. असेही त्यांनी म्हंटले.