आम्ही ‘फोडाफोडी’ केली तर अख्खं भाजप ‘रिकामं’ होईल, नवाब मलिकांचा भाजपला ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने फोडाफोडीचे राजकारण करु नये. 119 सदस्यांचा पाठिंबा असणाऱ्या भाजपकडे आता किती जणांचा पाठिंबा आहे ते आधी तपासा. जर आम्ही मनावर घेतले तर भाजपच रिकामा होईल, हे लक्षात ठेवावे, असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेताना प्रोटोकॉलनुसार शपथ घेतलेली नाही. त्यामुळे ही शपथ बेकायदेशीर असून ती रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. यावरुन प्रश्न विचारल्यानंतर मलिक यांनी भाजपला इशारा दिला.

भाजपचे काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजप रिकामं होईल असा दावा नवाब मलिक यांनी विधानभनामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आता सत्ता नाही म्हणून ते चलबिचल झाले आहेत. भाजपमध्ये असे अनेक आमदार आहेत ज्यांना आमिष दाखवून नेलं असल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. याविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावर मलिक म्हणाले, भाजप शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल असा टोला लगावला. नाव घेण्याची प्रथा भाजपने सुरु केली. हे बेकायदेशीर असलं असं म्हटलं तर लोकसभा बर्खास्त होलील. त्यांनी आधी स्वत:कडे पहावं नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावं असं मलिक म्हणाले.

Visit : Policenama.com