NCP Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीनंतर ED ने उचलले पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांची सक्तवसुली संचालनालयाने Enforcement Directorate (ED) चौकशी सुरु केली आहे. डॉन दाऊदचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन मलिक यांची चौकशी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ
— ANI (@ANI) February 23, 2022
ईडीचे एक पथक पहाटे ५ वाजता नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. तेव्हा नवाब मलिक यांनी आपणच ईडीच्या कार्यालयात ७ वाजता येतो, असे सांगितले. त्यानुसार सकाळी ७ वाजता नवाब मलिक (NCP Nawab Malik) हे ईडी कार्यालयात (ED Office Mumbai) पोहचले. तेथे त्यांची चौकशी केली जात आहे.
मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering) नवाब मलिक यांची ईडी अधिकार्यांकडून चौकशी सुरु आहे. १९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची जमीन नवाब मलिक यांनी घेतल्याचा आरोप भाजपने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता.
NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrived at the office of the Enforcement Directorate in Mumbai. He was summoned by ED in connection with a property with alleged links to the underworld, questioning is underway. pic.twitter.com/34aULItS10
— ANI (@ANI) February 23, 2022
दाऊद इब्राहिम हा भारतात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एनआयएला संशय असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीजकडून तपास केला जात आहे.
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा दाऊदचे नाव वापरुन जमीन व्यवहार करत असतो.
त्यात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. इक्बाल कासकर याच्याकडे ईडीने चौकशी केली होती.
त्यात कासकर याने मलिक यांचे नाव घेतल्याचे सांगितले जाते. त्यातूनच मलिक यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
नवाब मलिक यांची चौकशी सुरु झाल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप (BJP) व मोदी सरकारवर (Modi Government) मलिक हे आरोप करीत असल्याने
त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.
दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,
म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त (Police Bandobast) वाढविला आहे.
बॅरिकेट लावून परिसरात लोक जमू नये, अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Web Title :- NCP Nawab Malik | NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrived at the office of the Enforcement Directorate in Mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- TET Exam Scam | टीईटी गैरव्यवहारातील आरोपी IAS सुशील खोडवेकर याचा जामीन फेटाळला
- Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील
- ITR Verification | करदात्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत आवश्य करावे ‘हे’ काम, प्राप्तीकर विभागाने करून दिली आठवण