नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – भारतरत्नांचा अपमान करण्याचे काम भाजपा अन् मोदी सरकार करतंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अहमदाबादमधील यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. या नामांतरावरुन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार कोणतीही नाव बदलत आहेत. भारतरत्नाचा अपमान करण्याचे काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हा निर्णय सहन करणार नाही, असा घणाघात मलिक यांनी केला आहे. दरम्यान जगातील सर्वात मोठं असे लौकिक मिळवलेल्या या स्टेडियमचे नाव यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल असे होते. या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (दि.24) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. तसेच वनमंत्री संजय राठोड हे देखील या बैठकीला उपस्थित होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली नाही. शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही. पोहरादेवी गडावर कोणामुळे गर्दी जमली, याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील, असे मलिक म्हणाले.