NCP | … म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नाही – शरद पवार

यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, उद्याच्या महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी तयार होत आहे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपण 22 वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) उद्याला आला. आज याच पक्षातून उद्याच्या महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी तयार होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केले पाहिजे. या नेतृत्वाच्या फळीमागे सामान्य माणूस विश्वासाने उभा राहून त्यांची बांधिलकी कायम टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच मला स्वतःला राष्ट्रवादीच्या (NCP) भवितव्याविषयी चिंता वाटत नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त मंबईत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, आज राज्यात एका वेगळ्या विचाराचे सरकार स्थापन झाले आहे.
कधी कुणाला पटल नसतं की सेना आणि आपण एकत्र काम करू.

पण आपण ते करून दाखवलं. पर्याय दिला अन् सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला.
तिन्ही पक्ष योग्य पावलं टाकत असून महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे.

हे सरकार 5 वर्षे टिकेल. एवढच नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश व राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचे हे सरकार काम करेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

तसेच सत्ता ही विक्रेंदित झाली पाहिजे. केवळ एकाच ठिकाणी सत्ता राहिली की ती भ्रष्ट होते.
तसे होऊ द्यायचे नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे.

हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एससी, एसटी, ओबीसी या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे,
हे वाटले पाहिजे, ते कृतीत आणण्याची काळजी आपण घ्यावी, असे पवार म्हणाले.

तसेच राष्ट्रवादी NCP हा पक्ष समाजातील उपेक्षित घटकांच्या केवळ पाठीशी उभा राहतो असे नाही तर त्यांच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया सूपूर्द करून त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो.

त्यातूनच संबंध देशाला एक नवीन रस्ता दाखवू या असे आवाहन पवारांनी केले आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हे’करा

 

सुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे ! दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी