NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी केल्यामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group). पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राज्य महिला अध्यक्षपदी (State Women President) रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची निवड करण्यात आली आहे. विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्या जागी राष्ट्रवादीने रोहिणी खडसे यांनी निवड केली आहे.

याशिवाय बीड जिल्ह्यातील बबन गिते (Baban Gite) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) उपाध्यक्षपदी (Vice President) निवड केली आहे. रोहिणी खडसे या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या आहेत. त्या सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार (Maharashtra Political News) म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक भाजपच्या (BJP) तिकीटावर लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या सोबत राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. असं शरद पवार गटाकडून जाहिर करण्यात आलं आहे.

बबन गितेंची उपाध्यक्षपदी नियुक्ती

कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांची साथ सोडून शरद पवार याच्या
उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश करणारे बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना ही संधी दिल्याचे बोलले जात आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध बबन गिते असा अंतर्गत
वाद असून त्यामध्ये बबन गिते यांना बळ देण्याचा शरद पवार गटाने प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत