अखेर राष्ट्रवादीनं दाखवली ‘पॉवर’ अन् राज्यसभेची चौथी जागा पदरात पाडली !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मार्च अखेर निवडणूका होत आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा असून त्यापैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. तर उर्वरीत चार जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेल्या आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली असून एका जागेबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु होती. अखेर राष्ट्रवादीने आपली ‘पॉवर’ दाखवत राज्यसभेची चौथी जागा आपल्या पदरात पाडून घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची चौथी जागा पदरात पाडून घेत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील आपलं वजन पुन्हा सिद्ध केलं आहे. राज्यसभेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा एक उमेदवार निश्चित झाल्यानंतर चौथ्या जागेवर दावा सांगत राष्ट्रवादीने ती जागा पदरात पाडून घेण्यात यश मिळवले आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून फैजिया खान यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा असून त्यातील 7 जागांची मुदत संपत आहे. मुदत संपत असलेल्या जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सात जागापैकी भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून भाजपने आपले तीनही उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित एका जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरून महाविकास आघाडीत विचारविनीमय सुरु होता. अखेर राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून देत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली.

महाराष्ट्रातील राज्यसभेचे उमेदवार

भाजप – उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड
शिवसेना – प्रियांका चतुर्वेदी
काँग्रेस – राजीव सातव
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार, फैजिया खान