गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस आणि एका खासगी वाहन चालक शहीद झाले होते. याप्रकरणाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. कैलास रामचंदानी असे अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. भूसुरुंगासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अडकल्याने खळबळ उडाली आहे.

नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. या घटनेनंतर पोलिसांनी अटक सत्र सुरु करुन नर्मदाक्का आणि किरणकुमार यांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन आणि पुराव्यावरुन पाच जणांना अटक केली होती.

पाच जणांकडे चौकशी केली केल्यांनतर पोलिसांना मोठा मासा गवसला. कैलास रामचंदानी चे कुरखेडा येथे इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. मागील काही महिन्यापासून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुरखेडा तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी आहे. त्याचा या घटनेत कसा सहभाग होता. किती दिवसांपासून तो नक्षल्यांच्या संपर्कात होता याविषयी पोलीस तपास करत आहेत. या कारवाईनंतर आणखी नावे पुढे येण्याची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत