आरेच काय … मी तर पक्षातील जुनी खोंडंही सोडली नाही !, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर ‘निशाणा’
मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन ( अक्षय भुजबळ ) – नुकतीच भाजप सरकारने मुंबईतील आरे कॉलनीमधील झाडांची कत्तल केली त्यामुळे निसर्ग प्रेमींनी याबाबत भाजप सरकारविरोधात चांगलाच रोष व्यक्त केला. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही याबाबत एक व्यंग करत प्रशासनाच्या या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
इथे माझं जंगलराज आहे!!!
तुम्ही #Aarey बचाओ करत बसलात
मी तर पक्षातली जुनी खोडंही सोडली नाहीत.#AareyKillerDevendra#SaveAarey pic.twitter.com/avCkZqzQ88— NCP (@NCPspeaks) October 7, 2019
राज्यात विधानसभेच्या निवडणूका जाहीर होताच भाजपने आपल्यातील काही दिग्गज मंडळींना तिकीट नाकारले आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली. हाच धागा पकडून राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटरवरून एक व्यंगात्मक ट्विट केले आहे.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात कटर घेऊन उभे आहेत आणि बाजूला पडलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर भाजपने तिकीट नाकारलेल्या एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, मेधा कुलकर्णी, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचे शीर तुटलेल्या लाकडाच्या ओंडक्यांवर दाखवण्यात आलेले आहे. त्यासोबत एक महत्वाचे कॅप्शन देण्यात आले आहे. ‘आरेच काय घेऊन बसलात, मी पक्षातील जुनी खोंडंही सोडली नाहीत !
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर वरून ही पोस्ट टाकत इथे जंगल राज आहे, तुम्ही आरे बचाओ करत बसलात आणि मी तर पक्षातली जुनी खोंडंही सोडली नाही यावरून सत्ताधारी भाजपला चांगलीच चपराक लगावली आहे.
Visit : Policenama.com
- फिटनेस फ्रीक डेमी रोजच्या फोटोंनी सोशल मीडियावर ‘खळबळ’ !
- ‘असा’ निवडला होता आलिया भट्टने IIFA अवॉर्डसाठी ड्रेस ! (व्हिडीओ)
- फॅशन डिझायनर बेपत्ता, ‘या’ अभिनेत्रीने मागितली सोशल मीडियावर मदत !
- उर्वशी रौतेलाने डान्स करताना अचानक काढला टॉप ! (व्हिडीओ)
- शॉर्ट ड्रेस में श्वेता तिवारी की बेटी पलक का सिजलिंग अवतार, चर्चा में फोटोज
- Bigg Boss 13 : शहनाज कौर गिलचा बेड पार्टनरबाबत धक्कादायक खुलासा !
- ‘ड्रीमगर्ल’ नुसरत भरूचाचे ‘हॉट’ बिकीनीतील फोटो व्हायरल , फ्लॉन्ट केला कमरेवरील टॅटू
- Bigg Boss 13 : गोविंदाची भाची आरती सिंहचा खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा ! (व्हिडीओ)
- वयाआधीच तरुण दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतले इंजेक्शन्स , आता दिसते ‘अशी’
- ‘या’ अभिनेत्रीची आई होती बिकीनी घालणारी पहिली अॅक्ट्रेस , व्हॅक्सिंग करताना व्हायरल झाला होता MMS !