NCP On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ प्रकरणात मोठा ट्विस्ट ?; आता राष्ट्रवादीने केला ‘हा’ दावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP On Devendra Fadnavis | विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात काही व्हिडीओ क्लिप (Video Clip) दाखवत विधानसभा हलवून टाकली होती. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अडकवण्याचा कट आणि इतर प्रकरणांचे स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) दाखवत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi Government) संकटात टाकलं होतं. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र अशातच राष्ट्रवादीने (NCP On Devendra Fadnavis) यासंदर्भात दावा केला असून या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारे काल काम झालं आहे. एक कथित पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले. त्यातील काही व्हिडीओ दाखवण्यात आले. मात्र त्यांनी दाखवलेल्या व्हिडीओवर एक तारीख होती ती 1 जानेवारी 2019 म्हणजे तो व्हिडीओ देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा आहे, असा दावा राष्ट्रवादीने (NCP On Devendra Fadnavis) केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल्पनिक व्हिडीओ दाखवून महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं आहे.
राज्यात 18 नोव्हेंबर 2019 या तारखेला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे.
त्यामुळे आम्ही यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांना तक्रार करणार आहोत.
या व्हिडीओमागील खरा सुत्रधार कोण ? डायरेक्टर कोण ? याबाबत सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (Nationalist Youth Congress) करणार असल्याचं राष्ट्रवादीने सांगितलं आहे.

 

दरम्यान, विरोधी पक्षाने केलेले आरोप आणि राष्ट्रवादी पक्षाने केलेला दावा यासंदर्भात तपास (Investigation) झाल्यावर गोष्टी समोर येतील.

 

Web Title :-  NCP On Devendra Fadnavis | ncp reaction over devendra fadnavis pen drive bomb allegation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा