NCP On OBC Political Reservation In Maharashtra | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून 27 टक्के उमेदवार फत्त OBC समाजाचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP On OBC Political Reservation In Maharashtra | राज्यातील आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणात व्हाव्यात (Local Body Elections) यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आग्रही आहे. परंतु, सध्या या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. (NCP On OBC Political Reservation In Maharashtra)

 

या संदर्भात जयंत पाटील यांनी एक ट्विट केले असून यामध्ये म्हटले आहे की,
ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे.
यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

 

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. (NCP On OBC Political Reservation In Maharashtra)

तत्पूर्वी जयंत पाटील म्हणाले होते की, निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे.
म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission)
नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक पाहता या निवडणुकीत सर्वच पक्षांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

 

Web Title :- NCP On OBC Political Reservation In Maharashtra | ncp declares 27 percent seats ticket in local body elections will be given only to obc candidate said jayant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा