NCP on Raj Thackeray | राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले – ‘तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP on Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा (MNS Chief Raj Thackeray) नियोजित असणारा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) तूर्तास स्थगित केला आहे. याबाबत माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसने (NCP) राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी जे पोस्टर ट्विट करत अयोध्या दौरा तूर्तास रद्द करत असल्याचं म्हटलं आहे. तेच पोस्टर राष्ट्रवादीनेही ट्विट केलं आहे. मात्र त्यासाठी लिहिलेलं कॅप्शनची चर्चा रंगली आहे. (NCP on Raj Thackeray)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) ट्विट केलंं आहे की, “तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच”, असं ट्विट करण्यात आले आहे. दरम्यान, ट्विटमध्ये राष्ट्रवादीने मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडललाही मेन्शन केले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी मनसे वाद उफळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे अयोध्या दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे. दीड वर्षापूर्वी राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतु, पुन्हा एकदा पायाच्या दुखण्याने डोकं वर काढल्यामुळे राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे सांगितलं जात आहे. याबाबत राज ठाकरे यांनी 5 जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली. तसेच, रविवारी 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबतचं कारण सांगणार असल्याचंही ते म्हणाले.

 

Web Title :-  NCP on Raj Thackeray | ncp tweets about raj thackeray postponed ayodhya visit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा