राष्ट्रवादी संपलीय, शेकाप संपण्याच्या मार्गावर : अनंत गिते

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र असल्याने शिवसनेनेसाठी ते आगामी काळात मोठे आव्हान असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील पत्रकार संघाने आयोजित केलेल्या एका वार्तालाप कार्यक्रमात मात्र, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादी व शेकापचे कोणतेही आव्हान नसल्याचे म्हटले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे. शेकाप संपत चालला आहे. या पक्षांचे नेते एकत्र आले तरी जनता त्यांच्यासोबत राहणार नाही, असे गिते यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9bcbfa4-d1c6-11e8-bc46-3dae7d688512′]

अलिबाग प्रेस असोसिएशनने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित केला होता. या वार्तालाप कार्यक्रमात गिते बोलत होते. गिते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची आघाडी झाली. मात्र या आघाडीचा माला काहीच धोका नाही. शेकाप – राष्ट्रवादी काँग्रस यांचीआघाडी म्हणजे विळा – भोपळ्याची आघाडी आहे. विळ्यानेआपला गुणधर्म सोडला आहे, हे का एकत्र आले आहेत हे जनतेला माहित आहे. मी निवडणूक लढवणार आहे आणि निवडून येण्यासाठी जे करायचे आहे ते आम्ही केलेले आहे. भास्कर जाधव शिवसेनेच्या वाटेवर आहेत की नाही हे मला माहित नाही. पण ते येणार असतील तर त्यांचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, निवडणूकीपूर्वी तसेच निवडणूकीनंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्याची आम्हाला चिंता नाही. शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आहे. तसा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत मंजूर झाला आहे. असे असले तरी निवडून येण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करणार आहोत. आम्ही कामाला लागलो आहोत असेही गिते म्हणाले. इंधन दरवाढीवरून सरकारवर टीका करताना गिते म्हणाले, इंधन दरवाढीमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनसामान्यांचे हाल होत आहेत, डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाई वाढत चालली आहे. यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेना जनतेच्या या भुमिकेसोबत ठाम आहे असे म्हणत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. इंधनाचे दर जनसामान्यांच्या आवाक्यातच रहायला हवे अशी भुमिका त्यांनी मांडली.

[amazon_link asins=’B0154M6J2Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1613b5a-d1c6-11e8-aa29-81f938d2dae7′]

मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेताना गिते म्हणाले, केंद्र सरकारने कोकणातील विकासकामांसाठी चार वर्षांत भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या १०० टक्के चौपदरी करणाला मंजुरी मिळाली आहे. पळस्पे ते इंदापुर हे काम कंत्राटदाराच्या अपयशामुळे रखडले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने सुरु झाली आहेत. दहा टप्प्यात ती कामही सुरु असून जून महिन्याच्या अखेर पर्यंत ती कामे पुर्ण होतील,कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे कामही सुरु झाले पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर दरम्यानचे दुपदरीकरण होणार आहे. या रेल्वे मार्गावरील १४५ किलोमिटर मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. दिघी बंदराला रेल्वेने जोडण्याचे काम सुरु झाले आहे. अलिबाग पेण रेल्वेमार्गाचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. पनवेल ते पेण मार्गाचे विद्यूतीकरण पुर्ण झाले आहे. सागरमाला योजने आंतर्गत भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा सुरु होत आहे. चिपळूण करहाड रेल्वे मार्गाचे कामही सुरु झाले आहे. मुबई गोवा सागरी महामार्गाचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. अलिबाग वडखळ मार्गाचे चौपदरीकरण सुरु होणार आहे. या सर्व भौतिक सुविधामुळे जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. हि सर्व काम विरोधकांना दिसत नसतील त्यात माझा दोष नाही असे गीते म्हणाले.

बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस गाडीला भीषण अपघात, 3 जण (1 API, 2 PSI) जखमी


जाहिरात