‘सिल्व्हर ओक’वर 2 तास सुरु होती चर्चा, नेमकं काय घडले ?

पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार त्यांच्या भेटीला मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याच जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी माझा नातू अपरिपक्व असून, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही अशा शब्दांत फटकारले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पार्थ यांनी आजोबांच्या घेतलेल्या भेट महत्त्वाची आहे. अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी भाजपाकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही दिली जात आहे. त्याच वेळी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. यावर अजून पार्थ पवार यांनी या सर्व प्रतिक्रिया दिलेली नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like