शरद पवारांसमोर राडा करणाऱ्या शेखर गोरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

फलटण (सातारा) : पोलीसनाम ऑनलाईन – शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात शरद पवार यांच्याच भाषणावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाेरदार राडा झाला यानंतर हा वाद इतका वाढला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. इतकेच नाही तर यानंतर पवारांनी मध्येच भाषण थांबवले. यानंतर आता शेखर गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाकर देशमुख हे आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेखर गोरे म्हणाले की, “आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत,” असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “शरद पवारांच्या भाषणापूर्वी आमच्यापैकी एका कार्याकर्त्यांला भाषणाची संधी द्यावी असं आम्ही स्टेजवरील नेते मंडळींना लिहून दिलं होतं. आम्हाला आमच्यावर झालेला अन्याय पवार साहेंबांसमोर मांडायचा होता. परंतू आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून मला उभ केलं होतं. मात्र निवडणूकीत राष्ट्रवादीकडे 127 मतं जास्त असताना जर माझा पराभव होतो. हा माझ्यावर होणारा अन्याय आहे.”

“साहेबांना निवडणूकीत पूर्ण पाठिंबा आहे. पण जर मला माण तालुक्यातं नेतृत्व दिलं असताना मला व्यासपीठावर बोलू दिलं जातं नाही हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. मी माझं नेतृत्व वेळावेळी सिद्ध केलं असतानाही मला साहेबांना भेटू दिलं गेलं नाही. म्हणूनच मला माझ्यावरील अन्याय पवार साहेबांसमोर मांडायचा होता.” अशी खंत शेखर गोरे यांनी व्यक्त केली.

नेमकी घटना काय ?

माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. तो आज उघड झाला. मंचावर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी ‘सर्व सांगा, खरं सांगा’, असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घ्यावा लागला तरीही कार्यकर्ते ऐकायचे नाव नव्हते घेत.