NCP Political Crisis | शरद पवारांना आणखी एक धक्का, ‘या’ राज्यातील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाले होते. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Political Crisis) फूट पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागली गेली. परंतु यातच आता केवळ महाराष्ट्रात (Maharashtra NCP) नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला (NCP Political Crisis) असून, सर्वच्या सर्व 7 आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट (NCP Political Crisis) पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत (BJP) सत्तेत गेले आहेत. राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळातील (Cabinet) अर्थ, सहकार, कृषी यासारखी महत्त्वाची खाती आहेत. यातच राष्ट्रवादीचे सात आमदार एका राज्यात निवडून आले होते. त्यांनी देखील अजित पवार यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाल्यानंतर याचे लोण नागालँडमध्ये पोहचले आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवार यांना पाठिंबा दिली आहे. नागालँडमध्ये निवडून आलेल्या सर्व सात आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखी वाढली आहे. नागालँडमधील सर्व आमदारांनी एक परिपत्रक काढून अजित पवार यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे.

नागालँडची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली होती.
यामध्ये राष्ट्रवादीला सात जागांवर यश मिळाले होते. नामरी नचांग (Namari Nchang), पिक्टो (Pictou), एस. तोइहो येप्थो (S. Toiho Jephtho), वाय. म्होंबेमो हूमत्सो (Y. Mhombemo Humtso), वाय. मानखा ओकोन्याक (Y. Mankha Okonyak), ए पोंगशी फोम (A pongshi foam) आणि पी लॉन्गॉन (P longon) या राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं !
98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच
घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक