NCP Political Crisis | केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवारांना नोटीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे राहणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) हे आधी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) होते. ते मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. (Maharashtra Politics News) मात्र, सत्तापरिवर्तन झाल्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. महाविकास आघाडीत असताना अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद होते. मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन सत्तेत समील होण्याचा निर्णय घेतला. आणि 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेने (Shivsena) प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Political Crisis) पक्षात दोन गट पडले. अजित पवार गट आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group).

राष्ट्रवादीचे अध्यक्षपद, बहुतांश आमदार, पदाधिकारी अगदी लोक सुद्धा आमच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्ष आम्हाला देण्यात यावा अशी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाखल केली होती. या बंडानंतर शरद पवार गटानेही तातडीने हालचाली करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यावर म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नोटीस पाठविल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (NCP Political Crisis)

अजित पवार यांनी 30 जूनला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत त्यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत,
त्यामुळे पक्षाचं नाव (Party Name) आणि चिन्ह (Symbol)
आपल्याकडे राहावं, अशी याचिका अजित पवार गटाने आयोगाकडे केली आहे.
अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार
गटाचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला आहे. त्यानंतर पक्ष नक्की कुणाचा याबाबत निवडणूक आयोगात याचिकेला सुरुवात होईल. आता शिवसेनेसारख्याच सर्व घडामोडी पुन्हा एकदा राज्यात घडणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बी.टी. कवडे रोडवरील किराणा दुकानातून पैसे चोरणाऱ्या दोघांना
मुंढवा पोलिसांकडून अटक

Nana Patole On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला’,
नाना पटोलेंची सडकून टीका