‘पक्षाला धनंजय मुंडे यांचं नेतृत्व मोठं वाटलं असेल’, मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ ज्येष्ठ आमदारानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. या विस्तारात राष्ट्रवादीच्या १४, शिवसेना आणि अपक्ष १२ तर काँग्रेसच्या १० जणांनि आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र यानंतर पक्षातील अनेक आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर थेट राजीनाम्याचेच अस्त्र उपसल्याचे दिसून येत आहे.

माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश सोळंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे स्वतः त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कर्तृत्व जास्त आहे. त्यांचे नेतृत्व पक्षाला मोठं वाटलं असेल. तसेच आपण पक्षावर नाराज नसून राजकीय सन्यास घेत असल्याचे देखील सोळंकी यांनी सांगितले.

मराठवाड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं आहे. मी पक्षाशी अजिबात गद्दारी करणार नाही, मी अजूनही पक्षासोबत आहे आणि पक्ष सांगेल ते काम करु. कंटाळा आल्याने राजीनामा देत आहे याचा माझ्या मंत्री पदाशी संबंध लावून हे असे देखील सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.

मला का डावलण्यात आलं यासंबंधी पक्षच सांगू शकतो. पण राजकारणाचा वीट आल्याने मी निर्णय घेत आहे असे देखील सोळंकी यावेळी म्हणाले तसेच राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार असल्याचे देखील सोळंकी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता हा राष्ट्रवादी सोबत मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का समजला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/