NCP Prashant Jagtap | पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? NCP चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Prashant Jagtap | राज्यातील काही जिल्ह्याच्या महानगरपालिका निवडणूकांचे प्रभाग रचना (PMC Draft ward Structure) काल (1 फेब्रुवारी) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादरम्यान पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तंग झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पुण्यात पक्षांतराचे वारे देखील वाहताना दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी याबाबत खुलासा केला आहे.

 

प्रशांत जगताप म्हणाले, ”प्रभाग रचनेची फोडाफोडी आणि तोडफोड ही भाजपने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. प्रशासनाने दिलेली प्रभाग रचना स्वीकारणे हे आमचे पूर्वीपासूनच धोरण आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंभर पेक्षा जादा जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. परंतु, त्यांनी त्यांच्या आसपासचे लोक टिकवून ठेवावेत. सध्या आमच्याकडे त्यांच्या 16 नगरसेवकांची यादी आहे. त्यांचे प्रवेश केव्हा घ्यायचे हे वरीष्ठांशी चर्चा करून ठरवले जाईल.” (PMC)

 

पुढे प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) म्हणाले, ”प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीत राष्ट्रवादी 122 जागा स्वबळावर जिंकू शकते.
त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी,” असे मत त्यांनी मांडलं.
तसेच, ”प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते.
त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्टीकडे मांडणार आहोत.
मात्र, पक्षश्रेष्टी जो निर्णय देतील तो आपणास मान्य असेल,” असं देखील ते म्हणाले.

 

Web Title :- NCP Prashant Jagtap | 16 BJP corporators from Pune on the path of NCP NCP s city president Prashant Jagtap said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा