राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना मातृशोक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व महापालिकेचे माजी स्थायी सभापती प्रशांत शितोळे यांच्या मातोश्री मंदाकिनी कृष्णराव शितोळे (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी (दि.२) सकाळी निधन झाले.

त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (गुरूवार) दुपारी  सांगवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, रोहित काटे, नवनाथ जगताप, संदीप वाघेरे, मयूर कलाटे, माजी नगरसेवक शंकर जगताप, प्रसाद शेट्टी, नगरसेविका मंगला कदम तसेच सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.