‘मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावंस वाटलं तर…’ जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शरद पवारांचा सूचक इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांच्या मलाही मुख्यमंत्री (CM) व्हावं वाटतय या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (शुक्रवार) कोल्हापूरात मिश्किल प्रतिक्रीया देत एक सुचक इशाराही दिला आहे. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यावर शरद पवार म्हणाले, मग त्यात काय झालं. इच्छा व्यक्त करण्याचा सर्वांचा अधिकार आहे. त्यांना शुभेच्छा, उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं, कोणी करणार आहे का ? असे सांगत एक सुचक इशाराही शरद पवार यांनी दिला.

इस्लामपूरमध्ये मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलावून दाखवली आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील या मुलाखतीत म्हणाले की, दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावंस वाटू शकते. मलाही वाटणं स्वाभाविक आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

जयंत पाटलांचा युटर्न

राजकीय वर्तुळातील चर्चेनंतर मी असे म्हटलचं नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी युटर्नही घेतला. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का ? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत संबंधित वाहिनीने वृत्त दाखवले, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले. आमच्याकडे संख्याबळही कमी आहे शिवाय राष्ट्रवादीत कोणताही निर्णय केवळ शरद पवार हेच घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यात गैर काय ? – सुप्रिया सुळे

अजित पवारांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय ? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी दिली.

फक्त रोहित पवारांना स्वप्न पडणे बाकी

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात येत होती. भाजपा नेते अतुल भातळखकर यांनी ‘आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत’, असा टोला लगावला होता.