NCP president Sharad Pawar | केतकी चितळेने केलेल्या असभ्य टिकेवर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP president Sharad Pawar | अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिने देशातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन असभ्य टीका सोशल मीडिया (Social Media) च्या माध्यमातून केली होती. यानंतर संपूर्ण राज्यातून तिच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता खुद्द शरद पवार यांनी केतकीच्या त्या पोस्ट (Ketki’s Post) वर प्रतिक्रिया दिली आहे.

 

केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेत सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांनीही तिचा निषेध करत आहेत.

 

पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी रुपाली ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी तर तिच्या आई-वडिलांचे संस्कार कमी पडले असावेत. तिला दोन-चार फटके दिले पाहिजेत, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र पाठवून तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणावर राज्यात ठिकठिकाणी निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत असताना
खुद्द शरद पवार यांनीही याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, कोण केतकी चितळे? ती मला माहित नाही.
तीने कोणती पोस्ट केली तेही मला माहित नाही. आणि जी गोष्टी मला माहित नाही त्यावर मी भाष्य करणार नाही,
असे म्हणत पवार यांनी केतकी चितळे हिच्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

 

Web Title :- NCP president Sharad Pawar reply in one word about ketki chitale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा