धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार ? शरद पवार म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रेणू शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय हा गंभीर आहे. या प्रकारणातली सर्व माहिती घेतली आहे. एका महिलेने तक्रार केली आणि ही तक्रार गांभीर्याने घेतली गेली. मात्र मीडिया च्या माध्यमातून वेगळी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे योग्य ती माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल,” असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात मुंडे यांनी आम्हाला सांगितले होते. म्हणून ते स्वतः कोर्टात गेले होते. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे म्हणून त्यावर जास्त भाष्य करणार नाही. पण ज्यांनी तक्रार केली त्यांनी इतरांना देखील त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार केली आहे, असे मीडियाच्या माध्यमातून पुढे आले आहे. अशाच प्रकारचे आरोप आणखी पुढे आले आहेत, या सर्व प्रकरणी चौकशी सखोल झाली पाहिजे. एसीपी (Acp) लेव्हल ची महिला अधिकारी चौकशी करेल, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर चौकशी करण अपेक्षित आहे. मी काल बोललो तेव्हा अशा प्रकारे इतर माहिती बाहेर आली नव्हती’ असंही पवार म्हणाले.

‘या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मंत्रिपदी राहणे गरजे आहे का?’ असा सवाल विचारला असता, धनंजय मुंडे यांचे प्रकरणी गंभीर आहे. पण ज्यांनी आरोप केले त्याच्यावर देखील आरोप झाले आहेत’ असं म्हणत पवारांनी धनंजय मुंडेंवर तुर्तास कारवाई करण्याचे टाळले आहे. या प्रकरणाची काळजीपूर्वक चौकशी झाली पाहिजे, असं भाजपने सांगितलं. तरी त्यांच्याच पक्षाच्या माझी आमदाराने माहिती दिली आहे. विरोधी पक्ष म्हणून टीका करण्याची संधी दिली जाते. ज्यांच्या हातातून सता गेली त्याबाबत आकस समजू शकतो’ असं म्हणत पवारांनी भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान, आज सकाळी संजय राऊत यांनी सहकुटुंब पवार यांची भेट घेतली होती. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले की, ‘संजय राऊत त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण घेऊन आले होते. ही पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं पवार म्हणाले. ‘मला कोरोनाची लस मिळाली तर मी लगेच लस घेईल. पण महाराष्ट्र आणि दक्षिणेतील कंपनीच्या लसी या दर्जेदार आहेत’,’संवेदनाशील सरकार असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. पण रामजन्मभूमी निधी संकलनामध्ये राज्यपाल यांनी सहभागी होणे योग्य नाही, करण त्यातून अनेक मुद्दे, वाद समोर येतात’ असंही पवार म्हणाले.