रोहित पवार भडकले, घेतला पक्ष सोडून गेलेल्यांचा ‘समाचार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. अनेक नेते व आमदार पक्ष सोडून गेले आहेत. आणखीही काही लोक जाण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाची हालत काहीसी खराब असल्याचं दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रातून राष्ट्रवादीवर टीका होत आहे. मात्र शरद पवारांचे नातू आणि रोहित पवार यांनी या सगळ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

रोहित पवारांनी एक भली मोठी फेसबुक पोस्ट लिहून जे लोक आज शरद पवारांबाबत टिपण्णी करत आहेत त्यांचा समाचार घेतला आहे तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांनवरही रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणालेत रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये
स्वत:च्याच घरात आमदार की, खासदार की ठेवणारेच सध्या कुंपणावरून उड्या मारत आहेत, जाड-भरडं पीठ दुसऱ्या पक्षात गेलं. आता जमीनच नांगरायची वेळ आली आहे.
कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं पवार साहेबांचं राजकारण निश्चितच नाही, गेल्या ५० वर्षांतल्या तीन पिढ्या याला साक्ष आहेत.
महिलांना समान संधी देण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे.
राजकीय दबावाला बळी न पडता वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा, जातीपाती व धर्माधर्मांत भांडण लावण्याचा नव्हे तर माणसे जोडण्याचा हा इतिहास आहे.

पवारांची राजकीय कारकीर्द अधोरेखित करून सांगताना रोहित पवार म्हणतात शरद पवारांच्या राजकारणामुळं ज्यांनी शेतीतून चार पैसे कमावले, त्यांच्या मुलानं तालुक्याच्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊन नोकरी केली आणि आता त्यांचा नातू आयटी कंपनीत नोकरी करू लागलाय. शेतीपासून आयटी पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

२ रुपयांच्‍या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्‍या इतरही अमेझिंग फायदे 

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण  

लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या १२ संकेत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like