एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग; नागपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन

पोलीसनामा ऑनलाईनः वास्तूविशारद एकनाथ निमगडे यांच्या हत्या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 24) सकाळी नागपुरातील फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी फडणवीसांचा पुतळा जाण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांच्या फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी खुल्या कारगृहात केली आहे. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची 6 सप्टेंबर 2016 मध्ये भररस्त्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. कोट्यवधींच्या जमीनच्या वादातून काही अज्ञातांनी सुपारी घेऊन हत्या केल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला होता. ही जमीन फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आहे. या हत्येमध्ये फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल, असा दावा वेदप्रकाश आर्य यांनी केला आहे.