‘बाप बापच असतो’, पोस्टरबाजी करत राष्ट्रवादीची भाजपवर बोचरी टीका !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये आघाडीला दमदार विजय मिळाला. युतीच्या उमेदवाराला तर फक्त 1 जागाच जिंकता आली. सेनेनं 6 पैकी एकच जागा सुरक्षित केली परंतु भाजपला मात्र एकही जागा सुरक्षित करता आली. यानंतर आता कोल्हापूर मध्ये पोस्टर झळकत आहेत ज्यावर लिहिलं आहे, “बाप बापच असतो.” कोल्हापूर शहरातील एसटी स्टँड परिसरात हे पोस्टर लागले आहेत.

भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात एकही जागा वाचवता आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जागा जिंकली आहे. परंतु स्वत:च्या जिल्ह्यात मात्र ते अपयशी ठरताना दिसले. चंद्रकांत पाटील भाजपचे चाणाक्य म्हणवले जातात. राज्याच्या राजकारणातही त्यांचं वेगळं वजन आहे. असं असलं तरी कोल्हापूरात त्यांना एकही जागा जिंकून देता आली नाही. त्यामुळेच भाजपच्या नाकावर टिचून आता बाप बापच असतो असे पोस्टर कोल्हापुरात झळकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

Visit : policenama.com