पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ महत्वाची अट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर देखील सत्ता स्थापण्याबाबत भाजपानं असमर्थता दर्शविल्यानं दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राजभवनातून शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत शिवसेनेला अनेक महत्वाचे निर्णय घ्यावयाचे आहेत.

शिवसेनेला पाठिंबा हवा असेल तर त्यांनी सर्वप्रथम ‘एनडीए’मधून बाहेर पडावं तसेच केंद्र सरकारमधून बाहेर पडावं असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर अट ठेवली आहे असं आपल्याला दिसत आहे.

केंद्राच्या सरकारमध्ये शिवसेना वाटेकरी आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत हे केंद्रात मंत्री आहेत. राष्ट्रवादीनं शिवसेनेनं सर्वप्रथम एनडीएमधून बाहेर पडावं आणि केंद्र सरकारचे मंत्री असलेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं सांगितलं आहे. ही अट मान्य असल्यास शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस विचार करेल असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी उद्या (सोमवार) संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

Visit : Policenama.com