पुण्यात राष्ट्रवादीच्या रॅलीत झालेल्या वादातून कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रॅलीदरम्यान झालेल्या वादातून एकाला कोयत्याने व हॉकीस्टीकने मारहाण केल्याचा प्रकार रविवारी हडपसरच्या ससाणे लॉन्ससमोर घडला. याप्रकरणी ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सुफीयानी इनामदार, मुसाहिफ सय्यद, अदनान शेख, इरफान पठाण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अन्वर शमशुद्दीन इनामदार (३०, सय्यदनगर महंमदवाडी हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकूण १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अन्वर इनामदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचार रॅलीत ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांचे अफान इनामदार आणि सुफीयान इनामदार यांच्याशी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून त्यांनी दहा ते बारा जणांसोबत मिळून अन्वर यांच्यावर कोयता आणि हॉकी स्टीकने हल्ला करत मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. वरपडे करत आहेत.