शरद पवारांशी ‘एकनिष्ठ’ असलेलं ‘हे’ कुटुंब राष्ट्रवादीची साथ सोडणार ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गळती लागली. राज्यातील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत मोहिते पाटील घराण्यानेही राष्ट्रवादीची साथ सोडली. अशातच आगामी विधानसाभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक निष्ठावंत कुटुंब राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांचे बंधू आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली आहे. तसेच येत्या २० ऑगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. रश्मी बागल यांनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आता शिवबंधन बांधण्याची वेळ आली आहे अशी फेसबुक पोस्ट देखील दिग्वीजय बागल यांनी लिहिली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटेमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तानाजी सावंत, स्वर्गीय दिगंबर बागल, रश्मि बागल आणि दिग्विजय बागल यांचे फोटो आहे. या फोटो खाली ‘आता शिवबंधन बांधूया हाती,’ असा मजकूर लिहण्यात आला आहे.

कोण आहेत रश्मी बागल ?
करमाळ्याचे स्वर्गीय आमदार दिगंबर बागल यांच्या त्या कन्या आहेत. दिगंबर बागल यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी पत्नी शामल बागल यांना राष्ट्रवादीने २००९ मध्ये उमेदवारी दिली. दिगंबर बागल हे शरद पवारांचे निष्ठावंत समजले जात. त्यामुळेच त्यांना मंत्रीमंडळातही घेण्यात आले होते. २००९ साली माढा तालुक्यातील ३६ गावे करमाळा विधानसभेला जोडण्यात आली. राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना २००० साली उमेदवारी दिली मात्र त्यांचा केवळ २५३ मतांनी पराभव झाला. सध्या त्यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ साखर कारखाने आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीती आहे. दिगंबर बागल यांचे वारस म्हणून रश्मी बागल यांच्याकडे पाहिले जाते. रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी मानल्या जातात.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like