NCP Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…’; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Ravikant Varpe On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातील (Thane) सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण सुरू केल्याचं राज ठाकरे पाडव्याच्या सभेत म्हणाले होते. ठाण्यातील भाषणात पवारांच्या राजकीय कारकीर्दीवरून आणि मुस्लीम मतांवरुन राज ठाकरेंनी निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

शरद पवार हे सलग 55 वर्षे सर्व निवडणुका (Election) जिंकत आले आहेत. राज ठाकरे यांचा जन्म झाला त्यादिवशी शरद पवार साहेबांना आमदार होऊन एक वर्षे झालं असल्याचं रविकांत वरपे (NCP Ravikant Varpe On Raj Thackeray) म्हणाले. त्यासोबतच राज ठाकरेंनी कोणत्या निवडणुकीत विजयी झाल्याचं कोणाला माहिती आहे का ?, असं म्हणत वरपे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. रविकांत वरपे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र आहेत. साहेब म्हणजे सर्वांसाठी आधाराचा हात..सर्वांसाठी संकटात साथ. जनहितास झोकून देणारा, काळोखास भेदणारा सौख्याच्या किरणांचा हा सूर्य महाराष्ट्राला लाभला..!, असं कॅप्शन रविकांत वरपे यांनी दिलं आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad),
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांचाही खरपूस समाचार घेतला.

 

Web Title :- NCP Ravikant Varpe On Raj Thackeray | ncp leader slams raj thackeray saying sharad pawar was mla when mns chief was born

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा