‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा,’ रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

पोलीसनामा ऑनलाईन टीम –    कोरोना ( Corona) संकटानंतर आता राज्यभरातील साखर कारखाने ( Sugar Factory) सुरु होत आहेत. यामुळे मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या ( Sharad Pawar) उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीला भाजप ( BJP ) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यादेखील उपस्थित होत्या.

या बैठकीनंतर त्यांनी ट्विट ( Tweet) करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी या बैठकीनंतर ट्विट करत शरद पवार साहेब, hats off… कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” असे म्हटले होते. त्यामुळे हे ट्विट करत त्यांनी शरद पवार यांच्याविषयी आदर व्यक्त केल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत पंकजा मुंडे यांचे कौतुक आहे.

यावेळी रोहित पवार यांनी एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”. दरम्यान, काल पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Mundhe) हे सुद्धा उपस्थित होते. त्याची देखील सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.