NCP Rupali Patil Slam Sheetal Mhatre | गद्दार फेम शीतल म्हात्रे ताईंनी मिंधे गटाला खूश करण्यासाठी सुप्रिया सुळेंचा मॉर्फ फोटो ट्विट केला, रुपाली पाटील यांनी फटकारले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Rupali Patil Slam Sheetal Mhatre | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Eknath Shinde) हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा फोटो सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) विरोधकांनी धारेवर धरले आहे. मात्र, यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मॉर्फ केलेला फोटो ट्विट करून श्रीकांत शिंदे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न शीतल म्हात्रे यांच्या अंगलट आला आहे. कारण खरा फोटो आणि मार्फ फोटो राष्ट्रवादीने समोर आणल्याने म्हात्रे यांचा बचावाचा प्रयत्न उघडा पडला आहे. यावरून पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शीतल म्हात्रे यांना फटकारले आहे. (NCP Rupali Patil Slam Sheetal Mhatre)

 

रुपाली पाटील यांनी शीतल म्हात्रे यांच्यावर बोचरी टीका करणारी फेसबुक पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की, गद्दारांना क्षमा नाही… गद्दार फेम शीतल म्हात्रे ताई यांनी मिंधे गटाला खूश करण्यासाठी सुप्रिया सुळे महिला असूनही जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म फोटो ट्विट करुन बदनामी केली आहे. अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर लगेच गुन्हा दाखल होतो, कारवाई होते. तीच तत्परता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) इथे दाखवतील का? त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच! त्यांनी तात्काळ माफी मागावी.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेल्या मॉर्फ फोटोवर आक्रमक प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की, शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो पोस्ट केला आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर कारवाई करेल.

शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ फोटोचे सत्य काय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 23 एप्रिल 2021 रोजी कोविड उपाय योजनांबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वर्षा या शासकीय निवासस्थानातून
तर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांसोबत सदर बैठकीस मंत्रालयातून सहभागी झाले होते. त्यावेळेचा हा फोटो आहे

– आदिती नलावडे, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस 

 

Web Title :-  NCP Rupali Patil Slam Sheetal Mhatre | pune ncp rupali patil slam sheetal mhatre over supriya sule morphed photos tweeted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई