‘काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना माझं एकही काम केलं नाही’, खा. उदयनराजेंचा NCP वर ‘निशाणा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा चांगलीच रंगली असताना आता उदयनराजे यांनी राष्ट्रवादी विरोधी विधान करत खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी माझे एकही काम केले नाही, मी सांगून सांगून कंटाळलो पण काम झाले नाही असा खळबळजनक आरोप त्यांनी ऐन भाजप प्रवेशाच्या चर्चेदरम्यान केला आहे. आम्ही लोकांकरिता लढलो, रस्ता रोको केला, आमच्यावर केसेस झाल्या. काही कारण नसताना माझ्यावर खंडणीची केस दाखल झाली. 302,307 सारखे गुन्हे दाखल झाले, खोट्या केसेस झाल्या असे उदयनराजे म्हणाले.

भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मी याबाबत विचार करुन निर्णय घ्या, असे सांगितले आहे. येत्या काळातील राजकीय वाटचालीबद्दलचा निर्णय घेण्यासाठी काल उदयनराजेंनी समर्थकांची बैठक घेतली होती. त्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, जे काही होईल ते लोकांच्या हिताचे होईल. माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही विचार करुन निर्णय घ्या आणि मला सांगा असे मी सांगितले आहे. गेली 25-30 वर्षे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मला साथ दिली ते माझ्यासाठी महत्त्वाची आहेत.

मेगाभरतीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, राजकारण सुरु असते, सत्ता इकडची तिकडे जाते, मंत्री बदलतात. मी कधीही सत्तेसाठी अट्टहास केला नाही. मेगाभरतीला मी भीक घालत नाही, आम्हाला गरज पण नाही.

आरोग्यविषयक वृत्त –