‘त्या’नंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील ‘एकमेकां’समोर, झाली 15 मिनिटं ‘चर्चा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काही दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी दिली होती. त्यापैकी लोकसभा एक महत्वाचे नाव म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील होय. विजयसिंग मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील हे एकमेकांसमोर आले. आणि यावेळी व्यासपीठावर दोघांमध्ये १५ मिनिट चर्चा झाली. मात्र सगळ्यांना उत्सुकता होती की त्यांच्यात काय बोलणं झालं असणार परंतु ते अद्याप तरी कुणाला समजलेले नाही.

या कार्यक्रमात अनेक लोकांच्या भेटीगाठी झाल्या त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि विजयसिंग मोहिते पाटील. व्यासपीठावर शरद पवार उपस्थित असताना इतर नेत्यांशी बोलत असताना तिथे विजयसिंग मोहिते पाटील आले तेव्हा शरद पवारांनी त्यांना समोरच्या खुर्चीत बसण्यास सांगितले. या दरम्यानच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात देखील बराच वेळ चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहोचण्यास उशीर झाला असल्याने ही घडून आली.

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शरद पवार हे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार, भाजपा नेते विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच साखर कारखानदार, तसेच विविध भागातील ऊस उत्पादक शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/