NCP Sharad Pawar – BJP Girish Bapat | पुण्यात पवार-बापट यांची अशी झाली भेट, पवारांनी आपुलकीने केली तब्येतीची विचारपूस; बापट म्हणाले…

पुणे : NCP Sharad Pawar – BJP Girish Bapat | पुण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) हे सध्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. आज पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी गिरीश बापट यांची भेट झाली. यावेळी पवार यांनी आपुलकीने हस्तांदोलन करत बापट यांची विचारपुस करत म्हटले, गिरीशजी तब्येत काय म्हणतेय, बरी आहे का सध्या? यावर बापट यांनीही तितक्याच प्रेमाने आणि आदराने उत्तर दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि बापट यांचे जवळचे मित्र अंकुश काकडे (Ankush Kakde) देखील उपस्थित होते. (NCP Sharad Pawar – BJP Girish Bapat)

सध्या देश असो की राज्य, राजकारण इतके गढूळ झाले आहे की, वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते अराजकीय कार्यक्रमात सुद्धा समोरा-समोर आले तरी एकमेकांवर कुरघोड्या करताना आणि टोकाचे बोलताना दिसतात. राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे हे सूत्र शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने नेहमीच पाळले आहे. पुण्यातील भाजपा नेते गिरीश बापट सुद्धा असेच एक नेते आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांचे आणि बापटांचे वैयक्तिक पातळीवर अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. (NCP Sharad Pawar – BJP Girish Bapat)

आज पुण्यात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेला
खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोघेही उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि खासदार गिरीश बापट अगोदरच आले होते.
बापटांना पाहताच शरद पवार यांनी गिरीशजी तब्येत काय म्हणतेय, बरी आहे का सध्या?
अशी आपुलकीने विचारपूस केली. यावर बापट म्हणाले, बरी आहे साहेब आता.

गिरीश बापट सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. शरद पवार यांच्या कामाविषयी बापट संधी मिळेल तेव्हा कौतुक करत असतात.
बापट हे भाजपच्या जुन्या फळीतील मातब्बर नेते आहेत. पुण्यात भाजप वाढवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.
पुणे जिल्ह्यात पवारांचे वर्चस्व असतानाही बापट यांनी आपले स्थान मजबूत ठेवले.
याला पवार आणि बापट यांच्यातील सुमधुर संबंध कारणीभूत असल्याची चर्चा अनेकदा पुण्याच्या राजकीय वर्तुळात
होत असते. शरद पवार सुद्धा एखाद्या कार्यक्रमात संधी मिळेल तेव्हा बापट यांचे कौतुक करत असतात.

Web Title :- NCP Sharad Pawar – BJP Girish Bapat | NCP chief sharad pawar inquired about pune bjp mp girish bapat health