‘शिंदे-पवार’ एकत्र आले तर कोणाला ‘फेकून’ देऊ ते कळणारही नाही

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकार इतिहास बदलण्याचे काम करीत आहे. या सरकारने कोणतेही आश्वासन पाळले नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पवार आणि मी एकत्र येऊन कोणाला फेकून देऊ ते कळणार नाही असे सूचक विधान त्यांनी पंढरपूर येथील सभेत केले. या सभेत त्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्यावर टीका करण्याचे टाळले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सभा झाली. सुशीलकुमार शिंदे यांनी भारत भालकेंवर शेरेबाजी करताना ते दोन महिने भाजप आणि शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते. मात्र शेवटी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, सुशीलकुमार शिंदे यांनी आटोपशीर भाषणात सुरुवातीला भालके यांना चिमटे काढले.

भारत भालके हे दुसऱ्या पक्षात  जाणार म्हणून आम्ही पंढरपूरमधील काँग्रेसची उमेदवारी शिवाजी काळुंगे यांना दिली होती. मात्र, आता भारत भालके हेच काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील असे सांगत काळुंगे यांनी उमेदवारी घेतली नसली तरी उमेदवार भालकेच असल्याचा निर्वाळा शिंदे यांनी दिला. दरम्यान त्यांनी काँग्रेसने दिलेले उमेदवार यांनी बंडखोरी केल्याने त्यांना निलंबित केले असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी