शरद पवारांनी केलं आरोग्यमंत्री टोपेंचं कौतुक; पक्षांतर करणाऱ्यांचा उल्लेख करत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटात चांगली कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) 22 व्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून रोजी (गुरुवारी) आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी सवांद साधला. पक्षांतर करणाऱ्यांचा उल्लेख करताना पवार यांनी पक्षातील नेत्यांचं कौतुक देखील केलं. कोरोनाच्या महामारीत मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य खात्याने काम केलं आणि त्याचा परिणाम या सर्व संकटातून बाहेर पडू शकतो असा ठाम विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार ?
मुबंईत (Mumbai)आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सत्ता महत्वाची आहे.
परंतु, त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहे.
याचे शंभर टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱ्या सामान्यांचं असून त्यांची बांधिलकी कायम ठेवली पाहिजे.
तसेच, काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व तयार झालेत.
मंत्रीमंळातील अनेकजण नवी जबाबादारी पार पडत आहेत आणि यशस्वी होताना दिसत आहे.
एरव्ही हे लोकांसमोर आलं नसतं.
देशात इतकं मोठं भयानक संकट आलं असताना महाराष्ट्र राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली होती.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तसेच जनतेला दिलासा आणि विश्वास देण्यासाठी राजेश टोपेंच्या (Rajesh Tope) नेतृत्वात आरोग्य खात्यानं काम केलं आणि संकटातून बरे झालो, असे शरद पवार म्हणाले.

राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane), राजेश टोपे (Rajesh Tope) अशा प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आहे.
महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्वास देण्याचं काम राष्ट्रवादीने केलं असं म्हणत पक्षातील नेत्यांचं कौतुक देखील शरद पवार यांनी केलं आहे.
तसेच, राजकारणात नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे.
उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
पुढे ते म्हणाले, देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. 1977 साली जनता पार्टीचा प्रयोग झाला परंतु, 2 वर्षात तो प्रयोग संपला.
असे अनेक पक्ष आले. मात्र, राष्ट्रवादी पक्षाने बावीस वर्ष पूर्ण केलीत.
सहकाऱ्यांच्या कष्टानं, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत आलोय आहे.
जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) राज्यात चांगल्या पद्धतीने काम करीत आहे.
राज्यात तिन्ही पक्षाचं एकत्रित सरकार आहे.
आणि हे सरकार 5 वर्ष टिकणार असल्याचा देखील ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, पुढे पवार म्हणाले, मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातात गेली पाहिजे.
सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते.
सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहे असं वाटायला हवं. असे त्यानी स्पष्ट केलं आहे.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’