पुण्यातील भेटीदरम्यान शरद पवारांकडून खा. उदयनराजेंची ‘मनधरणी’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत असताना अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीच उदयनराजेंची भेट घेतली. शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ही भेट उदयनराजेंच्या मनधरणीसाठी असल्याची चर्चा सुरु झाली. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंशी चर्चा देखील केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

उदयनराजे भाजप प्रवेश करणार की राष्ट्रवादीतच राहणार यावर अजून संभ्रम आहे. कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे की, उदयनराजे दिल्लीत येऊन भाजप प्रवेश करणार आहेत. परंतू राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्यास विरोध केल्याने खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार नाही अशी माहिती आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले भाजप प्रवेशावरुन यूटर्न घेतील अशी शक्यता आहे.

तसेच स्थानिक नेत्यांना त्यांनी भाजप प्रवेश करु नका असे सांगितल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत राहणार की भाजपला जवळ करणार याबाबत अजून संभ्रम आहे.

उदयनराजेंनी भाजप प्रवेश करु नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका अशी विनंती केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –