NCP Sharad Pawar | लोकसभेसाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी, ‘इतक्या’ जागा लढवणार

मुंबई : NCP Sharad Pawar | आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी जागांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून इंडिया आघाडीतील (India Alliance) महाविकास आघाडीतही (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाने देखील विधानसभा आणि लोकसभेसाठी कंबर कसली असून लोकसभा जागांसाठी तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस (Congress) यांचे लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुकीत १२ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकांची सुद्धा जोरदार तयारी शरद पवार गट (NCP Sharad Pawar) करत आहे.
विधानसभेच्या जवळपास ५८ मतदार संघात शरद पवार गटाने उमेदवार ठरवले आहेत.

महाविकास आघाडीत डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप इत्यादी पक्ष आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना
ठाकरे गटाची युती आहे. त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे.
या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत.
त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप १६-१६-१६ असा होते की अन्य फॉर्म्युला ठरवण्यात येणार हे लवकरच समजणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

संभाजीराजेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण, म्हणाले – ‘मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीत संपवतो’