माढ्याबाबत प्रश्न विचारताच शरद पवार संतापले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार हे संयमी नेते असल्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. एकाच घरातील अनेक उमेदवार लोकसभा निवडणुकीला नको म्हणून शरद पवार यांनी माढ्यातून आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर आता, ते निवडणुकीला अचानक उभे राहून धक्का देणार अशा देखील चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीचा धागा पकडून शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार पत्रकारांवर संतापले आहेत.

माढ्यातील राष्ट्रवादी पक्षांतर्गत असणारी गटबाजी मिटवण्यासाठी आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याची घोषणा शरद पवार यांनी मागच्या काही दिवसापूर्वी केली होती. त्यानंतर मावळ मधून पार्थ पवार लढण्यास अत्यंत आग्रही असल्याचे पाहून नातवासाठी शरद पवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांनी उमेदवारी मागे घेताच त्यांच्यावर भाजपकडून टीकेचे सूर उमठू लागले. शरद पवार लाटेचा अंदाज ओळखतात आणि राजकारण करतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मागील दोन दिवसात शरद पवार पुन्हा माढ्यातून निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

तुम्ही माढ्यातून लढणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे असे पत्रकारांनी शरद पवार यांना विचारताच. शरद पवार संतापले आहेत. तुम्ही या प्रश्नांची चर्चा करत रहा. शेवटच्या दिवशी बातमीतील विश्वसनीयता तुम्हाला आपोआप समजून येईल असे शरद पवार संतापाच्या भरात म्हणले आहेत.