तर अनेक ‘चमत्कारिक’ गोष्टी बाहेर येतील, उदयनराजेंना शरद पवारांचे ‘प्रत्युत्‍तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जणू उदयनराजेंनी राष्ट्रवादी विरोधात रणशिंगचं फुंकले. एरवी उदयनराजेंनी अनेकदा पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जाहीरपणे टीका करायला सुरुवात केली.

‘राष्ट्रवादी सत्तेत असताना फक्त आडवा आणि जिरवा, हेच धोरण होते,’ असा आरोप उदयनराजेंनी केला होता. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

आम्ही सत्तेत असताना उदयनराजेंची कोणतीही कामे रोखली, असं माझ्या पाहण्यात नाही. त्यांची काही खासगी कामं रोखली असतील तर मला माहीत नाही. पण मी त्याविषयी आता भाष्य केलं तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील, असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी शरद पवारांनी याबाबत भाष्य केलं आहे.

उदयनराजे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. सकाळी माझ्या घरी झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणूक आणि त्यामध्ये उदयनराजे यांची जबाबदारी, पक्षाच्या आगामी वाटचालीचे नियोजन आखले गेले होते. पण दुपारनंतर उदयनराजेंनी आपला निर्णय बदलला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पक्षाला लागलेली गळती आणि सोबत असलेले सहकारी सोडून जाताहेत म्हणून तुम्हाला वाईट वाटत का ? असं प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले मला आजिबात वाईट वाटत नाही, उलट त्यांनी पक्ष सोडण्याची दिलेली करणे ऐकून हसू येत. मी जर घरात बसून असेल तर मला अस्वस्थ वाटेल. उलट लोकांमध्ये फिरलो तर त्यांच्याकडून ऊर्जा मिळते असं सांगत शरद पवारांनी नुकताच आपला राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे.

Visit – policenama.com