NCP-Shiv Sena | राष्ट्रवादी-शिवसेनाच्या नेत्यांमध्ये हमरीतुमरी? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘मला हात लावायचा नाही’; शिवसेना नेत्यानं म्हटलं – ‘पटत नाही, तर मग कशाला…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP-Shiv Sena | मागील दोन वर्षापुर्वी तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झालं. असं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र या तिन्ही पक्षात वारंवार काहीतरी कुजबूज पाहायला मिळते. याचं ताजं उदाहरण म्हणजे पुण्यातील (Pune News) जुन्नरमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांत हमरीतुमरी झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अतुल बेनके (Atul Benke) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांची भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक उडाली. सत्तेत एकत्रीत असणारे पक्ष या ठिकाणी वाद घालताहेत पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. (NCP-Shiv Sena)

जुन्नरमधील उंब्रज (Umbraj) येथे मुख्यमंत्री रस्ता योजनेतील कामाचं श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला असल्याचं दिसलं. गावातील रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके उपस्थित राहणार होते. परंतु, या कार्यक्रमासाठी शिवसेनेला मात्र आमंत्रण दिलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांच्या नावे असणाऱ्या योजनेचं श्रेय राष्ट्रवादी घेत असल्याने माजी आमदार सोनवणे बेनकेंच्यापुर्वी पोहचले होते. काही वेळानंतर बेनकेही त्याठिकाणी आले, दोघे शेजारी-शेजारी बसले त्यानंतर वाद रंगला. (NCP-Shiv Sena)

त्यावेळ शिवसेनेचे सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे बोनके यांना श्रेय घेण्याबाबत विचारत असताना हाताला स्पर्श केला.
यानंतर बेनके भडकले मला हात लावायचा नाही, हात खाली घ्या, अशी तंबी दिली.
त्यानंतर आपण फक्त स्पर्श केला असून पटत नसेल तर मग माझ्या बाजूला कशाला बसले?, अशी विचारणा सोनवणे यांनी केली.
बेनके यांनी यावर तुम्ही फक्त चर्चा करा, असं म्हटलं असता सोनवणे यांनी चर्चा करा म्हणता अन हाताचा मुद्दा घेऊन काय बसलात? असं देखील म्हणाले.
यानंतर काही वेळ तणावात वातावरण होते.
नंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
वाद मिटल्यानंतर पुन्हा दोन्ही नेते एकमेकांशी बोलु लागले.

दरम्यान, नंतर शरद सोनवणे (Sharad Sonawane) म्हणाले, जे काही घडलं ते अपुऱ्या माहितीमुळे घडलं असून चुकीचा प्रकार झाला.
पण यापुढे निश्चितपणे समन्वय साधून महाविकास आघाडीचं सरकार एकत्रितपणे पुढे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं ते म्हणाले.
त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याने मला जावं लागलं, संघर्ष थोडा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसवाले महाविकास आघाडी म्हणत असले तरी पुण्यात तसा मान, सन्मान मिळत नाही ही शोकांतिका आहे, असं बेनके म्हणाले.

 

Web Title :-  NCP-Shiv Sena | ncp mla atul benke shivsena former mla sharad sonavne controversy in junnar of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Common KYC | कॉमन KYC म्हणजे काय? सरकारच्या दृष्टीने का आणि कसे फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी? जाणून घ्या

 

Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात बीडमधील शिक्षकाला पुणे पोलिसांकडून अटक

 

Pune Corona Updates | पुण्यातील कोरोना रुग्णांत एका महिन्यात 10 पटीने वाढ