NCP – Shiv Sena | सेना-राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर; बीडमधील आमदार पुतण्यावर काकाचे आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  NCP – Shiv Sena | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅग्रेस या तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झालं आहे. मात्र राज्यात एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर कोणत्याही कारणास्ताव मतभेद पाहायला मिळत असतात. बीड नगरपालिकेतील (Beed Municipal) विकास कामावरून क्षीरसागर काका-पुतण्यात पुन्हा जुंपली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील बीड नगरपालिकेतील विकास कामात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) तसेच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) विनाकारण खोडा घालत असल्याच आरोप बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushan Kshirsagar) यांनी केला आहे. यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीपुर्वीच राजकारण (NCP – Shiv Sena) चांगलंच तापलं आहे.

तर, विकास कामे करू दिले नाही तर आमदार आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलाय.
यावरुन शिवसेनेच्या वतीने पत्रकार घेत राष्ट्रवादीवर आरोप करण्यातआलेत.
शिवसेना आणि भाजपचा ताब्यातील बीड गेवराई आणि धारूर (Beed Gevrai and Dharur) नगरपालिकेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जावी.
याबाबत आदेश धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काढला आहे.
मात्र, नगरपालिका ही स्वायत्त संस्था असतानाही पालकमंत्र्याकडून जाणीवपूर्वक सुडाचे राजकारण केलं जात असल्याचा आरोप खुद्द शिवसेनेकडून (Shiv Sena) केला जातोय.

 

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याचे शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushan Kshirsagar) यांनी म्हटलं आहे. बीड नगर विविध योजनेतून निधी मंजूर करून घेतला मात्र सुडाचे राजकारण करणार्‍या स्थानिक आमदारांनी पालकमंत्री यांच्याकडून नगरपालिकेच्या संविधानिक हक्क हिसकावून घेत बीड शहरात होणारी विविध विकास कामे अडवली आहेत.
2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत बीडकरांनी मोठ्या विश्वासाने विरोधकांना निवडून दिले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेची कामे 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मात्र, कारण नसताना पालकमंत्र्यांना हाताशी धरून आमदारांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. म्हणुन दलित वस्ती विकासापासून दूर राहिले आहेत.
सातत्याने पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि बीडचे स्थानिक आमदार मागासवर्गीयावर केला जात आहे.
हा अन्याय थांबवला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत
असा इशारा देखील शिवसेनेचे नगरसेवक विकास जोगदंड (Shiv Sena corporator Vikas Jogdand) यांनी दिलाय.

 

शिवसेनेचे नगरसेवक योगेश क्षिरसागर (Shiv Sena corporator Yogesh Kshirsagar) म्हणाले, बीड शहरात आमदाराच्या आशीर्वादाने दोन नंबरचे अवैद्य धंदे सुरू असून त्यामुळे बीडचे संस्कृती खराब होत आहे.
तसेच ग्रामीण भागातील रस्ते त्यांची दुरावस्था याकडे लक्ष न देता विकास कामात खोडा घालण्याचे काम करत आहेत.
तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीमध्ये टक्केवारीचे प्रकार सुरू आहेत.
याबरोबरच ब्लॅक मार्केटिंग, धान्य, वाळू यामध्ये आमदारांचे लोक आहेत मटके,पत्ते, हे सगळे आमदारांचे आहेत आणि यांची टक्केवारी आमदाराकडे जाते असा आरोप त्यांनी केला आहे.

या दरम्यान, योगेश क्षिरसागर यांनी आमदाराच्या दुर्लक्षामुळे खराब झालेल्या रस्त्यांचा व्हिडीओ दाखवत पोलखोल केली आहे.
तर याबाबत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना फोनवरून त्यांच्यावर झालेल्या आरोपावर विचारणा केली असता नगराध्यक्षा सारख्या छोट्या लोकांच्या आरोपावर मला बोलायला वेळ नाही असं उत्तर दिले.
तसेच बाईट देण्यास नकार दिला. यावरुन नगरपालिका निवडणुकीच्या (Municipal elections) आधीच बीडमधील राजकारण तापलं आहे.
बीड मधील काका-पुतण्या वाद पुन्हा वर दिसत आहे.

 

Web Title : NCP-Shivsena | beed clash between shiv sena and ncp allegation against sandeep khirsagar by bharatbhushan kshirsagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Home Loan Online Application | ‘होम लोन’साठी ऑनलाइन अप्लाय करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते नुकसान

Pune Corporation | आर सेव्हन अंतर्गत पालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये घुसखोरी ! 7 दिवसांत सदनिका न सोडल्यास गुन्हा दाखल करून साहित्य जप्त करणार

Pornographic Content | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने फसवणुकीच्या केसमध्ये दिल्ली पोलिसांकडे मागितला ATR