‘बश्या’ बैलाला उठवण्यासाठी ‘रुमणं’ हातात घ्याव लागतं, अजित पवारांची सरकारवर टीका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. बशा बैलाला उठवण्यासाठी हातामध्ये रुमणं घ्याव लागतं, अशा शब्दात अजित पवारांनी सराकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादीने पूरग्रस्तांना मदत केली. मात्र, त्याचे कसलेही फोटो काढले नाहीत. परंतु भाजपच्या मंत्र्यांना पूरग्रस्त भागात सेल्फी काढायला लाज वाटत नाही का ? कसली मस्ती चढली यांच्या डोक्यात ? असा प्रश्न उपस्थित करून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेचा रडीचा डाव

राज्यात तुमचे सरकार असताना शिवसेना मोर्चे काढतेय, शिवसेना रडीचा डाव खेळत आहे. खरिपाचा पीक विमा असताना रब्बीचा पीकविमा काढणाऱ्या कंपनीवर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि शेतकऱ्यांना द्या असे म्हणत त्यांनी शिवसेनवर खरमरीत टीका केली. राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आले आहेत.

व्हिडीओकॉन सारख्या कंपन्या बंद पडल्या आहे. कॅफे कॉफीच्या मालकाने कर भरुन देखील आत्महत्या केली. आम्ही पन्नास वर्ष राज्य केले. तेव्हा आम्ही अडीच लाख कोटी कर्ज काढलं. मात्र या पठ्ठ्यांनी पाच वर्षात तेवढ कर्ज काढलं. असे असतानाही राज्यात कामं का होत नाहीत, शिष्यवृत्ती का मिळत नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like